जळगाव जिल्ह्यात १४३ रुग्ण कोरोना मुक्त; नविन ८४ पॉझिटिव्ह
जळगाव प्रतिनिधी । आज जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त कोरोना अहवालात ८४ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत, तर १४३ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. विशेष बाब म्हणजे आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात बाधित संख्या ५३ हजाराच्या पार झाला आहे.
जिल्ह्यातील आजची कोरोना आकडेवारी–
जळगाव शहर २२, जळगाव ग्रामीण २, भुसावळ २१, रावेर २, यावल १, अमळनेर ५, चोपडा ४, पाचोरा २, भडगाव १, धरणगाव ६, एरंडोल ०, जामनेर २, पारोळा ३, चाळीसगाव ६, मुक्ताईनगर १, बोदवड ४, इतर जिल्ह्यातील २ असे एकुण ८४ रूग्ण आढळून आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात एकुण ५३०३३ कोरोना रूग्ण आढळून आले आहे. त्यात ५०७३४ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज एकाही रूग्णाचा मृत्यू झालेला नाही. तर एकुण मृत्यूचा आकडा १२५९ वर पोहचला आहे. रूग्ण रिकव्हरी रेट ९५.६६ टक्क्यांवर पोहचला आहे.