आरोग्यजळगाव

जळगाव जिल्ह्यात २३ रुग्ण पॉझिटिव्ह; ३५ कोरोनामुक्त

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्ह्यातील प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात आज २३ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून आले असून ३५ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यातील आजची आकडेवारी

जळगाव शहर १४, जळगाव ग्रामीण २, भुसावळ ३, रावेर ०, यावल १, अमळनेर ०, चोपडा ०, पाचोरा ०, भडगाव ०,धरणगाव ०, एरंडोल ०, जामनेर ०, पारोळा ०, चाळीसगाव ०, मुक्ताईनगर ०, बोदवड १, इतर जिल्ह्यातील २ असे एकुण २३ रूग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकुण संख्या ५४५२५ पर्यंत पोहचली असून ५२६७७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर आज एका रुग्णाचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १२९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, सद्या ५५१ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!