भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्याराष्ट्रीय

जशास तसे उत्तर देण्याचे आदेश

भारताने चीनलगतच्या सुमारे ३५०० किलोमीटर सीमारेषेलगत सैन्य तैनात केले असून चीनच्या कोणत्याही दुष्कृत्याला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश सैन्याला देण्यात आले आहेत. रविवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तिन्ही लष्करांच्या प्रमुखांसोबत चर्चा करून पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीनंतर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय लष्कर पूर्णत: सज्ज असून चीनने पुन्हा आगळीक केली तर चिन्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देण्यात येईल.

या बैठकीला भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल बिपिन रावत, लष्करप्रमुख जनरल एमएम नरवणे, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंग, वायू दलप्रमुख आर. के. एस. बदुरिया उपस्थित होते. राजनाथ सिंग सोमवारी रशिया दौर्‍यासाठी जाणार असून त्याआधी ही भेट घेण्यात आली आहे. यावेळी राजनाथ सिंग यांना लडाखमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी सर्व प्रमुखांना नियंत्रण रेषेजवळ हवाई तसेच समुद्र मार्गावर चीनच्या हालचालींवर नजर ठेवण्यात सांगण्यात आले आहे.

चीनने नियंत्रण रेषेवर पुन्हा आक्रमकपणा दाखवण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराला पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीनंतर सुत्रांकडून मिळाली आहे. पूर्व लडाख किंवा इतर ठिकाणी चीनने गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे तयार असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे.

प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गलवान खोर्‍यात १५ जूनच्या रात्री चिनी सैनिकांशी झालेल्या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाल्यानंतर या भागातील स्थिती अत्यंत तणावपूर्ण झाली आहे. समोरासमोर उभ्या ठाकलेल्या उभय बाजूच्या सैनिकांमध्ये कोणत्याही क्षणी ठिणगी पडून या भागातील स्थिती आणखी खालावण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!