भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

जाणून घ्या, आषाढी एकादशीचे व्रत आणि महत्त्व

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी म्हणून ओळखली जाते. आषाढी एकादशीला महाराष्ट्रात वेगळे महत्त्व आहे. आषाढ मासाच्या शुक्ल पक्षातील एकादशीला ‘देवशयनी’ आणि वद्य पक्षातील एकादशीला ‘कामिका एकादशी’, असे म्हणतात. वर्षभरातील २४ एकादशांमध्ये या एकादशीलाही अनन्य साधारण महत्त्व आहे.

या दिवशीच्या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, अशी मान्यता आहे. या एकादशीला देवशयनी एकादशी म्हणण्याचे कारण म्हणजे मनुष्याचे एक वर्ष हे देवांचे एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो असे मानले जाते. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते, म्हणजेच देवांची रात्र सुरू होते. म्हणून आषाढी एकादशीला `देवशयनी’ (देवांच्या निद्रेची) एकादशी’, असे म्हणतात.

विठुमाऊलीच्या वारीबद्दल ऐकणं, वाचणं यापेक्षा ती वारी प्रत्यक्ष अनुभवनं याला प्राधान्याने महत्व दिले जाते. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पायी वारी रद्द करण्यात आली. मात्र, परंपरा सुरू राहावी, यासाठी प्रातिनिधिक वारी साजरी केली जात आहे. ठरलेल्या तिथींना आळंदी, देहूहून संतांच्या पालख्यांनी प्रस्थान ठेवले. जाणून घेऊया या आषाढी एकादशीचे व्रत, महत्त्व आणि वारी आणि तिच्या परंपरेविषयी…

इतिहास

‘पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभ दैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराकडून अमरपद मिळवले. त्यामुळे तो ब्रह्मदेव, विष्णु, शिव अशा सर्व देवांना अजिंक्य झाला. त्याच्या भयाने देव त्रिकुट पर्वतावर धात्री वृक्षातळी एका गुहेत दडून बसले. त्यांना त्या आषाढी एकादशीला उपवास करावा लागला. पर्जन्याच्या धारेत स्नान घडले. अकस्मात त्यांच्या सर्वांच्या श्वासापासून एक शक्ती उत्पन्न झाली. त्या शक्तीने गुहेच्या दाराशी टपून बसलेल्या मृदुमान्य दैत्याला ठार मारले. ही जी शक्तीदेवी, तीच एकादशी देवता आहे.

आषाढी एकादशीचे व्रत

यंदा बुधवार, ०१ जुलै २०२० रोजी आषाढी एकादशी आहे. ३० जून २०२० रोजी सायंकाळी ७ वाजून ४९ मिनिटांपासून एकादशी सुरू होणार असून, ०१ जुलै २०२० रोजी सायंकाळी ५ वाजून २९ मिनिटांनी एकादशी समाप्त होईल. एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. सगळेच शैव आणि वैष्णव उपासक एकादशीचे व्रत करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी दशमीला एकभुक्त रहायचे.

एकादशीला प्रातःस्नान करायचे. तुलसी वाहून विष्णुपूजन करायचे. हा संपूर्ण दिवस उपवास करायचा. रात्री हरिभजन करत जागरण करायचे. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करायची आणि पारणे सोडायचे. या दोन्ही दिवशी ‘श्रीधर’ या नावाने श्रीविष्णूची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी करतात. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही वारी पायी केल्याने शारीरिक तप घडते, असे समजले जाते.

वारीच्या दिवशी वारकरी करतात प्रेमाची साठवण

एकदा तरी पंढरपूरची वारी करावी, असे आग्रहाने सांगितले जाते. सुमारे ८०० वर्षांपासून वारीची परंपरा अविरतपणे सुरू आहे, अशी मान्यता आहे. आषाढी एकादशीला पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे.

आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. शेतकरी आपल्या शेतात पेरणी करुन वारीला निघतात आणि ते घरी जाईपर्यंत शेत जोमाने वाढण्यास सुरुवात झालेली असते. हे पिकलेले धान्य ज्याप्रमाणे शेतकरी वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढी वारीच्या दिवशी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो असे म्हटले जाते.

…म्हणून विठूरायाला तुळस,मंजिरींचा हार वहातात

तुळस

तुळशीमध्ये श्रीविष्णूची सूक्ष्म स्पंदने (तत्त्व) आकर्षित करण्याची क्षमता जास्त असते. श्री विठ्ठल हे श्रीविष्णूचेच रूप आहे. विठ्ठलाच्या मूर्तीला तुळस वाहिल्याने ती जागृत व्हायला साहाय्य होते. त्यामुळे मूर्तीतील चैतन्याचा लाभ उपासकाला मिळतो.

तुळशीची मंजिरी

मंजिरी ही आपल्या स्पर्शातून विष्णुतत्त्वाला जागृत करणारी आहे. तुळशीत श्रीकृष्णतत्त्व असल्याने तिच्या मंजिरीतून उधळल्या जाणार्याु चैतन्याच्या प्रवाहामुळे श्री विठ्ठलाच्या मूर्तीतील श्रीकृष्णतत्त्व जागृत होते आणि भक्ताचा भाव वाढेल, तसे त्याचे विष्णुतत्त्वात रूपांतर होऊन भक्ताला निर्गुणस्वरूप चैतन्याची अनुभूती येते.

मंजिरींचा हार

श्री विठ्ठलाच्या छातीवर रुळणारा तुळशीच्या मंजिरींचा हार हा मूर्तीतील मध्यभागातील स्थितीविषयक श्रीविष्णुरूपी क्रिया-शक्तीला चालना देणारा असल्याने भाविकांच्या सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात.

इतिहासात पहिल्यांदा वारीचे भव्य रूप नव्हते

महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलनामाचा गजर करीत पंढरपुरला पायी चालत येतात. कोरोना संकटामुळे इतिहासात पहिल्यांदा पायी वारीचे भव्य रूप बघायला मिळाले नाही.

वारी अनुभवण्यासाठी जागतिक पातळीवरील अभ्यासक, संशोधक वारीमध्ये सहभागी होत असतात. ही वारी त्यांना अद्भूत आनंदानुभूती देऊन जाते. या दिवशी वारकरी चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. ज्या विठ्ठलासाठी कित्येक मैल प्रवास चालत केला, त्या दैवताचे भेट झाल्याने आनंदी झालेले हे वारकरी उपवास करतात. जे वारीला जाऊ शकत नाहीत, ते या दिवशी उपवास करुन मनोभावे विठ्ठलाची यथोचित पूजा करतात.

सावळ्या विठूरायाची पंढपूरची वारी

आषाढी एकादशीचे व्रत आषाढ शुद्ध एकादशीपासून करतात. आषाढी एकादशी व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते. या एकादशीनिमित्त वारकर्यांरकडून पंढरपूरची वारी केली जाते. वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायातील एक प्रमुख संप्रदाय आहे. वारकरी संप्रदायात केली जाणारी पंढपूरची वारी हादेखील एक साधनामार्गच आहे.

या संप्रदायात वार्षिक, सहामाह याप्रमाणे जशी दीक्षा घेतली असेल, तशी वारी करतात. ही कर्मकांडातील साधना आहे. वारीचे वारकरी देहाची पर्वा न करता मैलोन्मैल चालतात. असे केल्याने शारीरिक तप घडते, म्हणजेच हठयोग होतो. मुळात वारकरी संप्रदायाची साधना ही भक्ति योगानुसार केली जाणारी साधना आहे. वारीच्या वेळी केले जाणारे भजन-कीर्तन, नामस्मरण यात भक्तिजयोग व नामसंकीर्तनयोग यांचा सहज मिलाप झालेला दिसतो.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!