जामनेर तालुक्यतील भाजप कार्यकर्त्यांचा मुक्ताईनगर मध्ये खडसेच्या उपस्थितीत राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
मुक्ताईनगर (प्रतिनिधी )। जामनेर तालुक्यातील देवपिंप्री आणि नेरी येथील दोनशे भाजप कार्यकर्त्यांनी माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला .
यामध्ये सुरत येथील उद्योजक आबा पाटील, रवींद्र पाटील आणि देवपिंप्री बाळू पाटील, गोपाळ पाटील, सुभाष त्र्यंबक पाटील, अनिल सखाराम पाटील, गणेश बोरसे, तुळशीराम डोंगरे, दामू चिकटे,पोपट शेळके, नेरी बु येथील प्रमोद खोडपे, जयेश पाटील, सुरेश पाटील, दत्ता वाघोडे, विशाल कोळी, दानिश पिंजारी बेबीताई सखाराम पाटील, लताबाई भावलाल पाटील, सुशीलाबाई जगन्नाथ पाटील, कल्पना बाई बाळू पाटील, रत्नाबाई सुभाष पाटील यांच्या सह मुक्ताईनगर भाजप सरचिटणीस सुनिल काटे, भाजप तालुका उपाध्यक्ष संदीप जावळे आणि जामनेर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष रविंद्र पाटील म्हणाले जामनेर तालुक्यातील ही सुरुवात आहे अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्यासाठी इच्छूक असून आगामी काळात जामनेर तालुका राष्ट्रवादीमय करू यावेळी एकनाथराव खडसे मार्गदर्शन करताना म्हणाले काही लोक म्हणत आहेत नाथाभाऊ यांच्या सोबत कोणीच पदाधिकारी नेता यांनी प्रवेश केला नाही परंतु दिवाळी नंतर जळगाव येथे प्रवेश सोहळा घेऊन या लोकांना दाखवून देऊनाथाभाऊ सोबत कोण आहे ते आणि जे नेते आहेत ते कार्यकर्त्यां मधूनच घडत असतात म्हणून पक्ष संघटनासाठी प्रवेश करणारा प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पक्ष बळकट होऊन यातूनच उद्याचा नेता घडत असतो
यावेळी राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीसईश्वर राहणे,माजी सभापती विलास धायडे, जामनेर तालुका किसान सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, गोटूभाऊ मगर,शरद पाटील, सागर कुमावत,माजी सभापती राजू माळी, नगरसेवक शकील सर, मस्तान कुरेशी, बापू ससाणे, अनिल पाटील, प्रविण पाटील, आरिफ आजाद,आसिफ बागवान,देवेंद्र खेवलकर,रवी दांडगे, शिवाजी ढोले, भरतअप्पा पाटील,देविदास पाटील, अविनाश वाघ, राहुल राजपूत संजय माळी, सुनील पाटील, आरिफ भाई ,संजय कोळी,बापू ठेलारी, कैलास पाटील,योगेश कोलते,पांडुरंग नाफडे ,उपस्थित होते