भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावताज्या बातम्याराजकीय

जिल्हयातील शेतक-यांना रासायनिक खते तात्काळ मिळावे; सभापती रविंद्र पाटील यांची मागणी !

जळगांव (प्रतिनिधी)। जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असला तरी शेतकऱ्यांना रासायनिक खते मिळण्यास अवलंब लागत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ रासायनिक खते उपलब्द करून द्यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र सूर्यभान पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्षा रंजना पाटील ,उपाध्यक्ष लालचंद पाटील, मुख्यकार्यकारी बी एन पाटील, मुख्य लेखा वित्त विभागाचे गायकवाड,डॉ पांढरे उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की,
आपल्या जिल्हयात या वर्षी समाधनकारक पाऊस झालेला असुन शेतकरी वर्ग सुखावुन गेलेला आहे. तथापि आपल्या जिल्हयात रासायनिक खतांची व कृषि विषयक औषधींची उपलब्धता होत नसल्याचे निर्दशनास येत आहे,

शेतकरी वर्ग खते मिळवण्यासाठी सकाळी ५ वाजेपासुन रांगेत उभे राहत आहे तरी देखील खतांची उपलब्धता होत नाही. त्यात प्राधान्याने युरीया खतांची पिंकांच्या वाढीसाठी आवश्यकता असल्याने त्याची उपलब्धता स्थानिक दुकानदारांकडे होत नाही. तरी जिल्हयातील अधिनस्त असलेले कृषि विभाग व दुकानदार यांना आपल्या स्तरावरुन युरीया खते व ईतर कृषि विषयक खते व औषधी तात्काळ पुरेशा प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात यावे अशी मागणी जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र सूर्यभान पाटील यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!