भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यजळगाव

जिल्ह्यात आज दिवसभरात १०६३ कोरोना रूग्ण आढळले तर ११०३ रूग्ण झाले बरे !

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हा कोवीड रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात दिवसभरात १ हजार ६३ बाधित रूग्ण आढळून आले आहे. तर १ हजार १०३ बाधित रूग्ण कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात २१ जणांचा मृत्यू झाला.

आज दिवस भरातील आकडेवारी
जळगाव शहर -१६७, जळगाव ग्रामीण- २१, भुसावळ-९३, अमळनेर-२०५, चोपडा-९०, पाचोरा-४७, भडगाव-९, धरणगाव-२०, यावल-२८, एरंडोल-८६, जामनेर-१२६, रावेर-४६, पारोळा-१९, चाळीसगाव-७४, मुक्ताईनगर-२, बोदवड-२३ आणि इतर जिल्ह्यातील ७ असे एकुण १ हजार ६३ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

जिल्हा प्रशासनाने आज दिलेल्या अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख २० हजार ९९७ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ८ हजार १२९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. उर्वरित १० हजार ७०५ रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात जिल्ह्यात २१ बाधितांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्स डॉ. एन.एस.चव्हाण यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!