जिल्ह्यात आज नविन ७४३ कोरोना पॉझिटिव्ह; ७२३ रुग्ण बरे !
जळगाव (प्रतिनिधी)। जिल्हातील पाठविलेल्या संशयितांचे स्वॅबचा तपासणी अहवाल आज सायंकाळी प्राप्त झाला असून आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात आज एकुण ७४३ रूग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
जिल्हा माहिती कार्यालयाने आज संध्याकाळी एका प्रेस नोटच्या माध्यमातून जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची माहिती दिली आहे. यानुसार आज जळगाव शहर २००, जळगाव ग्रामीण २५, भुसावळ ४३, अमळनेर ५६, चोपडा ६५, पाचोरा ४, भडगाव ४६, धरणगाव २३, यावल १४, एरंडोल ४७, जामनेर ६१, रावेर २७, पारोळा ३४, चाळीसगाव ६६, मुक्ताईनगर १८, बोदवड ९, व दुसर्या जिल्ह्यांमधील ७ असे रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात एकूण कोरोना बाधीतांचा आकडा ४०९०८ इतका झालेला आहे. यातील २९८९१ रूग्ण बरे झाले आहेत. आज १९ रुग्णांचा मृत्यू झाला असून आजवरील मृतांची संख्या १०२७ इतकी तर उपचार घेत असलेले ९९९० असल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केले आहे.