जुगार अड्डयांवर सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकाचा छापा, चौघांवर गुन्हा दाखल
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
जळगाव (प्रतिनिधी)। जळगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात जुगाराच्या अड्ड्यावर सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाने छापा टाकून ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करून चौघांवर एआयडीसी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला .
येथील शहरातील अजिंठा रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समिती जवळील जावेद टायर पंचर दुकानाच्या मागे मोहित मेन्स पार्लरच्या भिंतीला लागून चार जण बेकायदेशीर सट्टा व जुगार खेळ असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांना मिळाल्याने बुधवार ६ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी पोलीस उपनिरीक्षक सुनिल पाटील, पोहेकॉ किरण धमके, पोहेकॉ राजेश चौधरी, पो.ना. महेश महाले, पो.कॉ. रविंद्र मोतीराम, पो.कॉ. रोहिदास आगोणे, पो.कॉ. गोपाल पाटील, पो.कॉ. अनिल खोंदले, पो.कॉ. अभिषेक पिसाळ त्याच्या पथकाने कारवाई करून संशयित आरोपी पंढरीनाथ भोजू हटकर (वय-४८) रा. म्हसावद ता.जि.जळगाव, राजू गजानन पाटील (वय-२४) रा. रामेश्वर कॉलनी, रामभाऊ निना पाटील (वय-५३) रा. रामेश्वर कॉलनी या तिघांना ताब्यात घेतले. तिघांची अंगझडती घेतली असता ६ हजार ४३० रूपये रोख आणि ३० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल असा एकुण ३७ हजार ४३० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.