ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय

ठाकरे सरकार मधिल आणखी एका मंत्र्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह !

मुंबई: महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना आता ठाकरे सरकार मधील आणखी एका मंत्र्यांचा कोरोनाची तपासणी अहवाल बाधित आढळून आला आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे

मुंबईचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय मंत्री यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती ट्वीट करून दिली आहे. ” माझा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे , परंतु मी ठीक असून मला कोणतेही लक्षण दिसत नाही, सद्या मी स्वतः ला आयसोलेत केले असून, माझी विनंती आहे की माझ्या संपर्कात आलेल्यांनी त्यांनी कोविड टेस्ट करून घ्यावी. आणि मी माझ्या राज्यासाठी घरून काम करणार आहे ” असे शेख यांनी ट्वीट करून सांगितले आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!