डांभुर्णी येथे गरजु ९० कुंटुबांना
स्वयंदीप प्रतिष्ठान तफै किराणा वाटप
हिंगोणा ता.यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातिल
स्वयंदीप प्रतिष्ठान डांभुर्णी आणि संस्थेचे सर्व युवा कार्यकर्ता यांच्या प्रयत्नातून आणि संस्थेचे अध्यक्ष मा.श्री नितीन दादा सोनवणे यांच्या संकल्पनेतून डांभुर्णी गावातील आदिवासी समाजातील 90 कुटुंबांना जीवनावश्यक किराणा सामान आणि अन्नधान्य याचे वाटप आज संध्याकाळी आदिवासी वस्तीत करण्यात आले .
खरतर कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेच्या पार्श्वभूमीवर ताळेबंद असल्यामुळे घरातून बाहेर पडणं सगळ्यांना अशक्य झालं होतं त्या काळात अत्यंत हलाखीच्या आणि ज्यांचा हातावर पोट आहे अशा आदिवासी बांधवांसाठी त्यांचं महिन्याभराचा तरी सामान किराणा त्यांना उपलब्ध व्हावा या उद्देशाने 4 एप्रिल 2020 रोजी हे सामान वाटप होणार होते मात्र एका दुर्दैवी घटनेमुळे हा उपक्रम पुढे ढकलण्यात आला होता आणि आज तो पार पाडण्यात आला.
या कार्यक्रमाचं उद्घाटन गावातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ मंडळी यांच्या हस्ते झालं यात प्रामुख्याने अशोक दत्तात्रय सोनवणे ,.रामचंद्र विष्णू चौधरी, ग्रामपंचायत सदस्य ..कपिल सरोदे ,शिवसेनेचे सुभाष नेहेते,पत्रकार.मनोज नेवे,.रावसाहेब सोनवणे,आण्णा मामा यांची उपस्थिती होती तसेच या उपक्रमांमध्ये विशेष सहकार्य सामाजिक कार्यकर्ते कमलाकर कडू कोळी, अरविंद दादा बाविस्कर,भगवान दादा बाविस्कर रविदादा सपकाळे, प्रदीप कोळी , भारतीय सेनेतील जवान श्री.विजय कोळी ,स्वयंदीपचे संस्थापक सचिव संदीप पाटील(सोनवणे),लोकेश महाजन,कुंदन कोळी,जयदीप कोळी,गणेश बाविस्कर ,सुमेध बाविस्कर,मयूर सोनवणे,अर्जुन साळुंके,योगेश कुंभार,देवानंद कोळी यांचे अनमोल सहकार्य लाभले