डिसेंबर महिन्यात १४ दिवस बँका बंद राहणार
मुंबई (प्रतिनिधी)। डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण तरीही १४ दिवस बँकां बंद असणार आहेत. त्यामुळे बँकांचे व्यवहार वेळेत पूर्ण करा.
डिसेंबर २०२० मध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत. आता नवीन महिना आणि नवीन कामांच नियोजन सुरू झालं असेल. तर या नियोजनापूर्वी जाणून घ्या डिसेंबर महिन्याचं शेड्युल.
महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर असल्यामुळे बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला रविवार असल्यामुळे देशभरातील सर्वच बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे.
यानंतर १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि १३ डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँकांचे कामगाज बंद राहणार आहे. २० डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत. त्यानंतर २४ अणि २५ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे.
शिवाय २६ आणि २७ डिसेंबर रोजी चौथा शनिवार, रविवार असल्यामुळे सलग चार दिवस काम बंद राहणार आहेत. यामुळे बँकांशी संबंधीत सर्व काम वेळेत करून घ्या.