डीवायएसपी वाघचौरे ची गुटका तस्करावर संक्रांत: भुसावळात ५४ हजाराचा विमल गुटका जप्त
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
भुसावळ (प्रतिनिधी)। जिल्ह्यात फैजपूर, यावल, रावेर, जळगाव अश्या अनेक ठिकाणी अवैध गुटका मोठ्या प्रमाणावर पकडला गेला असून भुसावळ शहरात सुद्धा गुटक्यावर मोठी कारवाई करण्यात आली ,भुसावळ शहरातील आवेश पार्क,डायमंड कॉलनी,अनिस बागवान आलू वाले यांच्या घराच्या पाठीमागे विमल गुटख्याचा मोठा साठा राहत्या घरात असल्याचे खात्रीलायक गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी वाघमारे यांना मिळाल्याने त्यांनी ५३,६८० रुपयांचा विमल गुटखा जप्त केला.
या बाबत बाजारपेठ पोलिसस्टेशनला पोकॉ संदेश अरुण झांबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी यासिन उर्फे अज्जू अनवर शेख वय २१ राहणार भुसावळ शहरातील आवेश पार्क, डायमंड कॉलनी,अनिस बागवान आलू वाले यांच्या राहत्या घराची झडती घेतली असता ३०,८८८ रुपयांचे केसरयुक्त विमल पान मसाला ,८८ पाकिटे,१६,४५६ केसरयुक्त विमल पान मसाला,१५६ पाकिटे,२,९०४ (व्ही.आय)तंबाखू १५६ तंबाखू ,३,४३२ रुपयांचे (व्ही.आय) तंबाखू १५६ पाकीट असे एकूण ५३,६८० रुपयांचा विमल गुटखा मिळून आला असून बाजारपेठ पोलीस स्टेशनला भाग-६ गुरुन ०९७९ कलम ३२८,१८८,२७२,२७३ अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ चे कलम ३०(२)(a),२६(२)(iv). २७(२)(e) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि कृष्णा भोये करीत आहे.