तब्बल १२ दिवस बंद राहणार मे महिन्यात बँका
Monday To Monday News Network।
मुंबई (वृत्तसंस्था)। देशात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. मे महिन्यात कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे मे महिना सर्वांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. मे महिन्यात बँकांचे कामकाजही १२ दिवस बंद राहणार आहे. मे महिन्यात तब्बल १२ दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे आपली बँकेची सर्व महत्त्वाची कामे लवकर करुन घ्या, मे महिन्यात १२ दिवस बँक बंद राहणार आहेत. या सुट्ट्यामध्ये पाच दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत. त्याचबरोबर राहिलेल्या सुट्ट्या या शनिवार आणि रविवारमधील आहेत.
RBI च्या वेबसाईडवर आलेल्या सुट्ट्यांच्या यादीत १ मेला महाराष्ट्र दिना व कामगार दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे. तर दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यानंतर ८ मे रोजी बँकेचा दुसरा शनिवार असणार आहे तर दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने ८ व ९ मे रोजी बँका बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे ७ मेला जुमात ए विदा असल्याने बँका बंद राहणार आहे. यादिवशी केवळ जम्मू आणि श्रीनगरमधील बँका बंद राहणार आहेत.
मे २०२१ मधील बँकांच्या सुट्ट्यांची संपूर्ण याद
१ मे २०२१ : महाराष्ट्र दिन,कामगार दिन
२ मे २०२१: रविवार
७ मे २०२१ : जुमन उल विदा
८ मे २०२१ : दुसरा शनिवार
९ मे २०२१ : रविवार
१३ मे २०२१ : रमजान ईद
१४ मे २०२१ : अक्षय तृतीया
१६ मे २०२१ : रविवार
२२ मे २०२१ : चौथा शनिवार
२३ मे २०२१ : रविवार
२६ मे २०२१ : बौद्ध पौर्णिमा
३० मे २०२१ : रविवार