तापीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; हतनूर धरणांचे २४ दरवाजे उघडले !
भुसावळ (प्रतिनिधी)। हतनूर धरण परिसरात गेल्या काही दिवासांपासून सतत पडत असलेल्या पावसाचीसंततधार कायम असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले असून धरणातून आज शुक्रवारी ७५ हजार १२५ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
याबाबतची माहिती जळगाव पाटबंधारे विभागाचे उप कार्यकारी अभियंता यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे. गेल्या २४ तासांत पावसाची संततधार सुरू आहे. हतनूर धरण परिसरात गेल्या २४ तासांत ३८.४ मिमी पाऊस झाला आहे. तापी व पूर्णा नदीच्या उगम स्थानावर जोरदार पाऊस झाल्याने हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाणी साठा वाढ झाल्याने शुक्रवारी सकाळी ७ वाजेपासून धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले. यामुळे तापी नदी काठच्या गावांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात पाण्याची सातत्याने आवक होत असल्याने पाणी पातळीत वाढ होत आहे. पुढील 72 तासापर्यंत पाणी पातळीत सतत वाढ होणार असल्याने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.जळगाव जिल्ह्यातील हतनूर प्रकल्पाचे 24 दरवाजे पूर्ण उघडले असून 12 दरवाजे 1.00 मीटरने उघडण्यात आले आहे. त्यामुळे तापी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील विसर्ग अजून वाढणार आहे. यासाठी पुढील 72 तासासाठी नागरीकांनी नदी काठावर जावू नये. आपली गुर-ढोरे नदीकाठी जावू देऊ नये व नदीकाठी असल्यास सुरक्षित स्थळी हलवावी. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे