भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

प्रशासनभुसावळरावेरसामाजिक

तापी काठावरील गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा !

भुसावळ (प्रतिनिधी)। तापी नदी व बऱ्हाणपूर परिसरात सतत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे हतनूर धरणाचे २४ दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहे. यामुळे तापी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.

जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली आहे. या अनुषंगाने २४ दरवाजे पूर्ण उघडून विसर्ग सुरू आहे. सतत पाऊस सुरू असल्याने संध्याकाळपर्यंत धरणातून अजून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येईल. असे हतनूर पाटबंधारे विभागाचे उपअभियंता श्री. महाजन यांनी कळविले आहे. तसेच वाघूर धारण पूर्ण भरल्याने आज रात्री केव्हाही धरणाचे पूर्ण दरवाजे उघडण्यात येणार असून  नागरिकांना दक्षता घेण्याचा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
     

जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनीही आवाहन केले आहे की, तापी नदी काठावरील गावातील नागरिकांनी सावधानता बाळगावी. तसेच कोणीही नदी पात्रात जावू नये. आपली जनावरे नदीपात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी. 

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!