भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

यावल

तिरुपतीनगर खुल्या जागेवरील महिला बगीच्याचे अपूर्ण कंपाउंड भिंत महिलांच्या छेडखानी साठी पळवाट.

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (प्रतिनिधी)। तिरुपतीनगर मधील महिला गार्डनचे संरक्षण भिंतीचे काम दक्षिण बाजूने अपूर्ण ठेवल्याने ठेकेदाराने संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण का ठेवले? बांधकामास कोणी विरोध केला आहे का?तसेच शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून ठेकेदाराने किंवा नगरपालिका मुख्याधिकारी/ नगरसेवकानी संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई का केली नाही? इत्यादी अनेक प्रश्‍न उपस्थित केले जात असून महिला बगीच्याचे संरक्षण भिंतीचे काम तत्काळ पूर्ण करावे अशी मागणी होत आहे.

शहरातील तिरुपतीनगर परिसरातील खुल्या जागेवर/ओपन स्पेस जागेवर यावल नगरपरिषदे मार्फत महिलांसाठी बगीच्या बांधकाम करण्यात येत आहे या खुल्या जागेला चारही बाजूने संरक्षण भिंत बांधण्यात आली बगीच्या साठी स्वतंत्र प्रवेश द्वार ठेवलेले असताना सुद्धा दक्षिणे कडील रस्त्यावर एक भला मोठा ट्रक बगीच्यात प्रवेश करू शकतो एवढी मोकळी जागा सोडून संरक्षण भिंत कंपाऊंड अपूर्ण ठेवल्याने(रिकाम टेकड्यांना काही तरुण आणि पुरुषांना)भविष्यात महिलांच्या बगिच्यात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांची छेडखानी करण्या साठी(प्रेम प्रकरणासाठी )जागा मोकळी/पळवाट ठेवण्यात आली असल्याचे संपूर्ण यावल शहरात बोलले जात असून याकडे यावल नगरपरिषद मुख्याधिकारी व नगरसेवक यांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांमधून होत आहे सदरच्या ठेकेदाराने कंपाऊंड/संरक्षण भिंतीचे काम अपूर्ण का ठेवले बांधकामास विरोध करणाऱ्या विरुद्ध आणि शासकीय कामकाजात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल का केला नाही? इत्यादी अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल नगरपरिषदेने ठेकेदारामार्फत पोलीस बंदोबस्तात सर्व समाज हितासाठी महिला बगीचा कंपाउंड चे काम पूर्ण करावे अन्यथा तिरुपतीनगर परिसरातील सर्व स्तरातील महिला नागरिक मोठे आंदोलन छेडणार असल्याचे सुद्धा बोलले जात असल्याने कायदा व सुव्यवस्था शांतता तसेच जातीय सलोखा कायम राहण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित सर्व यंत्रणेने मंजूर प्लॅन इस्टिमेट प्रमाणे महिला बगीच्या कंपाऊंडचे काम तत्काळ कोणताही बदल न करता पुर्ण करावे असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!