दोन कोटींचे चरस; ३६ किलो गांजा जप्त, एएनसी व एसीबी ची मोठी कारवाई
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
मुंबई (प्रतिनिधी)। एएनसी व एनसीबीने केलेल्या विविध कारावाईत दोन कोटींच्या चरससह ३६ किलो गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणी कुर्ल्यातील महिलेसह तीन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली असून विलेपार्लेतून मध्य प्रदेशच्या दुकलीला बेड्या ठोकण्यात आल्या.
अमली पदार्थ नियंत्रण कक्षाची (एनसीबी) बॉलीवूडबरोबरच महानगरातील ड्रग्जविरोधातील कारवाई सुरूच आहे. याअंतर्गत कुर्ल्यातील एलटीटी येथे रविवारी रात्री एका महिलेसह तीन तस्करांना पथकाने छापा मारून अटक केली. त्यांच्याकडून ६ किलो ६२८ ग्रॅम चरस जप्त केला. मादक पदार्थांच्या बाजारात त्याची किंमत अंदाजे २ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले. आफताब शेख, साबिर सय्यद व शमीम कुरेशी अशी त्यांची नावे आहेत. तिघेही कुर्ला पूर्व परिसरात राहतात. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात अमलीपदार्थ असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने छापा मारून ही कारवाई केली. तिघांच्या घराच्या झडतीत बंदी असलेले काश्मिरी चरस जप्त करण्यात आले