धक्कादायक; जळगावात विवाहितेशी जवळीक साधत महिलेवर अत्याचार; गर्भवती राहिल्याने बेकायदेशीर गर्भपात
जळगाव (प्रतिनिधी)। येथील आपल्या पती बेपत्ता झाल्याने पतीला शोधण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेल्या महिलेसोबत एकाने ओळख करीत जवळीक साधली व महिलेवर अत्याचार केले. यातून ती महिला गर्भवती राहिल्याने त्या इसमाने त्या महिलेचा गर्भपात करुन तीला सोडून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनला शहरातील २३ वर्षीय महिलेचा पती बेपत्ता झाल्याने बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यासाठी गेली असता तेथे पोलीस स्टेशनबाहेर असलेले त्या महिलेची ओळख रविंद्र भगवान भडक या इसमासी झाली, नंतर तुमचा पतीला शोधण्यास मी मदत करेल असे सांगत त्याने महिलसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. तसेच त्या महिलेचा पतीला शोधण्यासाठी रविंद्र भडक हा तीला सोबत घेवून त्याला शोधण्यासाठी घेवून जात तिच्यावर अत्याचार केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली.
महिलेला सुरुवातीला रविंद्र भडक याने सोयगाव येथे नेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर वेळोवेळी तिला लग्नाचे अमिष दाखवून शिर्डी, अजिंठा, फर्दापूर येथे घेवून जात अत्याचार केला तसेच घर मालकाचे भाडे थकीत झाल्याने रविंद्र भडक याने त्या महिलेला त्याच्या ओळखीने खोली घेवून दिली होती. दरम्यान, त्या महिलेच्या पतीचा शोध लागला परंतु त्याला या सर्व प्रकारची माहिती झाल्याने त्याने त्या विवाहितेला नांदविण्यास नकार देत पुन्हा तिला सोडून दिले. यावेळी रविंद्रने त्या विवाहीतेला लग्नाचे वचन देत तिला संसारपयोगी वस्तूंची खरेदी करुन दिली मात्र, सदरील महिलेवर वारंवार अत्याचार झाल्यानंतर ती विवाहीता गर्भवती झाली. परंतु रविंद्र भडक याने गर्भपाताच्या गोळ्या आणून देत एका खासगी डॉक्टराकडून त्या विवाहीतेचा गर्भपात केल्याप्रकरणी त्या महिलेने शुक्रवारी रामानंदनगर पोलिस स्टेशनला धाव घेत याप्रकरणी विवाहीतेच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे