तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वर्षभर अत्याचार करत गर्भपात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील अट्रावल येथील २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी वर्षभर शारीरिक संबंध ठेवत अत्याचार करून गर्भपात केल्याची घटना घडली असून याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेली माहिती अशी, श्रावण कैलास कोळी राहणार अट्रावल याने एका तरूणीशी सूत जमवत तिला विवाहाचे आमिष दाखवत तिच्यासोबत तब्बल १ सप्टेंबर २०१९ पासून ते ५ डिसेंबर २०२० दरम्यान संशयिताच्या गावातील राहत्या घरी व इतर ठिकाणी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित करत अत्याचार केले त्यातून ती गरोदर झाल्याने तिला बळजबरीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून गर्भपातासाठी भाग पाडले नंतर वर्ष उलटूनही आरोपीने तरुणीशी लग्न केले नाही जेव्हा पीडितेने लग्नासाठी आग्रह केल्यावर संशयित आरोपी कोळीने लग्नाला नकार दिल्याने पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिस स्टेशनला याप्रकरणी श्रावण कोळी विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.