भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यारावेर

धक्कादायक: सावदायेथे कार्यरत असलेला LIC कर्मचारी  कोरोना बाधित !

सावदा ता.रावेर (प्रतिनिधी): तालुक्यात कोरोनाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सावदा शहरातही आज पुन्हा एक व्यक्ती कोरोना बाधित आढळुन आला आहे. शहरातील रावेर रोड वरील LIC इमारतीत कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्यास कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले असुन सदरील रुग्ण जळगाव येथील रहिवासी आहे. पुन्हा परिसरातील चिंतेच्या वातावरणात भर पडली असुन  रुग्ण बाधित आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.तर रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन कॉरंटाइन करण्यात येत आहे. तर बाधित रुग्णांचा रहिवासी असलेला परिसर प्रशासनाकडून सील करण्यात येत असून सदरील वृत्तास स्थानिक नगरपालिका प्रशासनाने दुजोरा दिला आहे.

मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!