यावल

धरणातील ओहर फ्लो पाणी पुलावरून सोडल्याने शेडगाव बॉरेंज धरणावरील पादचारी पूल गेला वाहून.

कोरपावली (प्रतिनिधी)। यावल तालुक्यातील शेडगाव बॉरेंज हा एक मोठा प्रकल्प असून त्यावरील सांडपाणी वाहणारा पादचारी पूल वाहून गेला,
शेडगाव बॅरेज हा प्रकल्प गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मोठया झपाटयाने काम सुरू केले गेले मोठया ब्रिजला लागूनच एक सांड पाणी वाहण्यासाठी पूल बांधण्यात आला या पुलावरून फैजपुर व यावल परिसरातील नागरिक जळगाव जाण्यासाठी ये जा करण्यासाठी अत्यांत सोईचे व कमी वेळात जळगाव अंतर गाठून आपला वेळ वाचावीत असताना अचानकच धरणातील ओहोर फ्लो झालेले पाणी या पुलावरून सोडल्याने काही तासातच पूल वाहून गेला या मुले अनेक गावाचा सम्पर्क तुटल्याने नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे,

कोट्यवधी रुपये खर्च करून प्रकल्प राबवित असताना यावर नियंत्रण असलेल्या अधिकारी वर्गाने क्वालिटी कन्ट्रोल करणाऱ्या इंजिनियर यांच्यावर दुर्लक्ष केल्याने संबधित काम अतिशय निकृष्ट प्रतीचे झाल्याचे दिसून येते , या बलाढय कॉन्ट्रॅक्ट दाराला कुणाचा आशीर्वाद लाभतोय…? यांचेवर काही कारवाई करण्यात येणार का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे,

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!