भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आंतराष्ट्रीयताज्या बातम्या

धर्मांतर निकाहसाठी जबरदस्ती, पाकिस्तानात हिंदू मुलीचं अपहरण !

नवी दिल्ली: पाकिस्तानात राहणाऱ्या हिंदू, आणि शीख आदी अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर धर्माच्या नावाखाली अत्याचार सुरूच आहेत. या घटनांमध्ये वाढ झाली आहे. बळजबरी धर्मांतर करण्यासाठी कुख्यात असलेल्या सिंध प्रांतातील मीरपूर खासमध्ये एका अल्पवयीन मुलीचं अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या मुलीचं जबरदस्ती धर्मांतर आणि ‘निकाह’ लावून देण्याची तयारी करण्यात येत असल्याचे समजते.

१२ वर्षीय मुलीचं तिच्या घरातून काही कट्टर धर्मांधांनी अपहरण केलं. तिच्या कुटुंबीयांनी जेव्हा याबाबत पोलिसांत तक्रार दिली, त्यावेळी त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. हतबल झालेल्या कुटुंबीयांनी आता सगळं देवाच्या भरवशावर असल्याचं सांगितलं. या धर्मांधांसमोर अल्पसंख्याक हिंदू समाज हतबल असल्याचे चित्र आहे.

अल्पसंख्याकांवरील अत्याचाराची ही पहिलीच घटना नाही. जूनच्या शेवटच्या आठवड्यातील एका अहवालानुसार, सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणात हिंदुंचं धर्मांतर करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी त्यांच्यावर जबरदस्ती केली जाते. सिंधच्या बादिनमध्ये १०२ हिंदुंचं बळजबरी धर्मांतर करून त्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास भाग पाडलं. यात लहान मुलं, महिला आणि पुरुषही होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!