भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

मुक्ताईनगर

नऊ महिन्याच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मुक्ताईनगर उपविभागीय पोलिस अधिकारी पदी प्रताप शिकारे !

मुक्ताईनगर, प्रतिनिधी-अक्षय काठोके : मुक्ताईनगर विभागाचे  तत्कालीन पोलीस उपअधिक्षक विवेक लावंड यांची बदली झाल्यानंतर तब्बल ९ महिन्यापासून रिक्त असलेल्या पदावर एमआयडीसी पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांची बढती देत नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती खात्री लायक सूत्रांकडून मिळत आहे.

राज्याच्या राजकारणात नेहमी चर्चेत असलेल्या मुक्ताईनगरात गेल्या फेब्रुवारी म्हणजे ९ महिन्यांपासून उप विभागीय अधिकारी हे महत्त्वाचे पद रिक्त होते. प्रशासनाकडून मुक्ताईनगर येथे पूर्ण वेळ आधिकारी दिला जात नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत होते. याबाबत वेळोवेळी “मंडे टू मंडे न्युज” ने वृत्त प्रकाशित प्रकाशित करत लक्ष वेधले होते. संवेदनशील तालुका अशी ओळख असलेल्या मुक्ताईनगरबाबत प्रशासन मात्र असंवेदनशील असल्याचे दिसून आले होते .

प्रताप शिकारे यापुर्वी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत असून त्यांना बढती देत मुक्ताईनगर विभागाच्या पोलीस उपअधिक्षक पदी नियुक्ती करण्यात आलीय. अशी माहिती मिळत असून मुक्ताईनगर शहरात विभागात नूतन पोलीस उपअधिक्षक प्रताप शिखरे यांच्यापुढे आता गुन्हेगारी व अवैध धंद्यावर नियंत्रण आणण्याचे आव्हान असणार आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!