भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

राजकीयराष्ट्रीय

नरेंद्र मोदींचा जलवा कायम ! देशातील ७८ % जनता कामावर समाधानी, पंतप्रधानांच्या शर्यतीतही टक्कर देणारा कुणी नाही- सर्व्हे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या कार्यकाळाला आता सव्वा वर्ष पूर्ण होत आले आहे. दरम्यानच्या काळात मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने कलम ३७० हटवण्यासह ट्रिपल तलाक आणि सीएएबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. मात्र गेल्या काही काळापासून देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटाने मोदी सरकारसमोर गंभीर आव्हान उभे केले आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारा सर्वे समोर आला असून मोदींचा जलवा कायम असल्याचे आकडेवारी सांगत आहे. या सर्वेनुसार देशातील ७८ टक्के लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले आहे. तसेच पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही मोदींनी इतर नेत्यांपेक्षा मोठी आघाडी घेतली आहे.

आज तक इंडिया टुडेसाठी कार्वी इनसाइड्स लिमिटेड या संस्थेने केलेल्या या सर्वेनुसार देशातील ७८ टक्के लोकांनी मोदींचे काम खूप चांगले किंवा चांगले आहे, अशी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींच्या कामगिरीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ३० टक्के लोकां मोदींची कामगिरी उत्कृष्ट तर ४८ टक्के लोकांनी चांगली असल्याचे सांगितले. १७ ट्के लोकांच्या म्हण्यानुसार मोदींची कामगिरी सामान्य असल्याचे तर पाच टक्के लोकांनी वाईट असल्याचे सांगितले.

दरम्यान, पंतप्रधानपदाच्या शर्यतीतही कुठल्याही नेत्याला मोदींच्या आसपासही जाता आले नाही. या सर्वेनुसार नरेंद्र मोदी हे पुढील पंतप्रधान म्हणून लोकप्रिय आहेत. नरेंद्र मोदी हेच देशाचे पुढील पंतप्रधान असले पाहिजेत, असे ६६ टक्के लोकांनी या सर्वेमध्ये सांगितले. तर पंतप्रधानपदाच्या शर्यतील काँग्रेसचे नेते राहुल गांधी दुसऱ्या स्थानी राहिले. सर्वेमधील आठ टक्के लोकांनी राहुल गांधींच्या नावाला पसंती दिली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना भावी पंतप्रधान म्हणून पाच टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर ४ टक्के लोकांनी अमित शाह यांच्या नावाला पसंती दिली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही प्रत्येकी तीन टक्के लोकांनी भावी पंतप्रधान म्हणून पसंती मिळाली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांना प्रत्येकी दोन टक्के मतदारांनी पसंती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!