भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

महाराष्ट्र

नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त निधी चांदवड पालिकेत मीच आणला, मी तर जनतेचा सेवक –/श्री भूषण कासलीवाल


चांदवड -नाशिक (उदय वायकोळे)। चांदवड नगरपरिषद मधील उपनगराध्यक्ष व प्रथम नगराध्यक्ष श्री भूषण कासलीवाल यांच्याविरोधात 13 नगरसेवकांनी अविश्वास ठराव आणण्यासाठी पत्र दिले होते.मात्र त्याआधीच उपनगराध्यक्ष भूषण कासलीवाल यांनी आज दि 15 ऑक्टोबर रोजी राजीनामा दिल्याने शहरात चर्चा रंगू लागल्या आहेत.
आज श्री भूषण कासलीवाल यांनी पत्रकार परिषद घेऊन आजपर्यंत 59 महिन्यात केलेल्या विकासकामे ,निधी मंजूर होऊन सुरू असलेली कामे याबाबत खुलासा केला.त्यांनी सांगितले की सुरुवातीस अडीच वर्षे नगराध्यक्ष व नंतरचे अडीच वर्षे उपनगराध्यक्ष पदावर असताना चांदवड शहराला कसा निधी उपलब्ध होईल याकडे लक्ष केंद्रित करून नाशिक जिल्ह्यात नवीन नगरपरिषद मध्ये सर्वात जास्त निधी आणलेला आहे. आजपर्यंत 154.26कोटी रुपयांची कामे निधी मंजूर होऊन सुरू आहेत,यात प्रामुख्याने चांदवड शहराला 24 तास पाणीपुरवठा करणारी 74 कोटी रुपयांची योजना येत्या 3 महिन्यात पूर्णत्वास जाईल असे कासलीवाल यांनी सांगितले.चांदवड शहरात पाण्याचा निचरा होण्यासाठी सांडपाणी नियोजन व भुयारी गटार योजना ही जवळपास 46 कोटी रुपयांची असून तिचे काम सुरू आहे.
५९ महिने सोबत काम केल्यानंतरही अविश्वास ठराव केल्याने मीच अचंभीत होऊन मला धक्काच बसला असल्याचे भूषण कासलीवाल यांनी सांगितले.
आजपर्यंत मी जनतेची सेवा केली आहे व उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतरही नगरसेवक म्हणून जनतेच्या सेवेत हजर राहीन असेही कासलीवाल म्हणाले,यावेळी अंकुर कासलीवाल,महेश खंदारे,बाळा पाडवी, सुरेश जाधव,जैन सर,नितीन फंगाळ आदी उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!