निंबादेवी नंतर मोर,गारबर्डी,अबोडा धरण सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित, प्रांत डॉ.अजित थोरबोले यांचे आदेश !
यावल (सुरेश पाटील)। तालुक्यातील निंबादेवी धरणा नंतर आता यावल तालुक्यातील मोर धरण, रावेर तालुक्यातील गारबर्डी,अबोडा धरण सुद्धा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी घोषित केले.
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या मोरधरण क्षेत्रात मागील काही दिवसापासुन पर्यटनाचा भाग म्हणुन धरणावर जळगाव जिल्ह्यातील नागरीकांची मोठी गर्दी होत असुन या गर्दीमुळे सध्या कोरोना विषाणुच्या साथीच्या रोगा मुळे लागु करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसुन येत असल्याने रावेर तालुक्यातील गारबर्डी व अबोडा धरणावर गर्दी करणाऱ्यांवर प्रांत अधिकारी डॉ.अजीत थोरबोले यांनी यावल रावेर तालुका महसुल प्रशासनास दिनांक ३ सप्टेंबर 2020रोजी पाठवलेल्या आदेशपत्रात म्हटले आहे की , सार्वजनीक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात उद्धभवलेल्या कोवीड १९ कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभूमीवर साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ हा ३१ मार्च 2020 पासुन संपुर्ण राज्यात लागु करण्यात आला असुन, यावल तालुक्यातील हिंगोणा गांवाजवळ सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेले मोर प्रकल्प धरण रावेर तालुक्यातील गारबर्डी,अबोडा या ठिकाणी मागील काही दिवसापासुन या धरणावर रविवार या सुटीच्या दिवशी परिसरातुन आणि जळगाव जिल्ह्यातुन मोठया प्रमाणावर धरणावर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या गर्दीमुळे कोरोना विषाणुसंसर्ग प्रतिबंधक कायद्याचा उल्लंघन होत असल्याने या गोंधळामुळे संसर्ग वाढीला लागणार असल्याचे चित्र निर्माण झाले असुन,खबरदारीचा उपाय म्हणुन प्रांतअधिकारी डॉ. अजित थोरबोले यांनी मोर धरण प्रकल्प,गारबर्डी व अबोडा धरण प्रतिबंधक क्षेत्र म्हणुन घोषीत केले.या संदर्भात धरणाकडे जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करावीत व या मार्गाने कायदा मोडुन वाहने नेणाऱ्यांवर मोटर वाहन कायदा अधिनियम नुसार कडक कारवाई करावी असे आदेश प्रशासनास दिले आहेत.