निंभोरा ते खिर्डी रस्त्यावर पसरले धुळीचे साम्राज्य….
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता. रावेर (भिमराव कोचुरे)। निंभोरा ते खिर्डी या रस्त्यावर उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्यामुळे आजू बाजूला टाकलेल्या मातीच्या ढिगार्यांमुळे धुळीचे प्रमाण जास्त वाढत आहे.वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात असल्याने वाहन चालकांसह, नागरिकांना,व शेतकऱ्यांना ना धुळीच्या समस्येला सामोरे जावे लागते.या रस्त्यावर वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून समोरून,मागून येणारी वाहने दिसत नाहीत.त्या मुळे सदर ठिकाणी केव्हाही अपघात घडू शकतो .या अपघातांना जबाबदार कोण? असा प्रश्न वाहन चालक, व नागरिकांना पडला आहे.
या पुलाचे काम मात्र संथ गतीने सुरू असल्याने रस्त्यावर सर्वत्र धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने दुचाकी,चारचाकी वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे.तसेच या रस्त्यावरून मोठी वाहने जातात तेव्हा मोठ्या प्रमाणात धूळ उडत असून काही काळासाठी समोरचे वाहन दिसेनासे होत असते.वेळप्रसंगी दुर्घटना घडण्याची शक्यता असते.या रस्त्यावर पाणी मारले जात नसल्याने.धूळ श्वासावाटे शरीरात जाते त्यामुळे ॲलर्जी त्रास असणाऱ्यांना सर्दी,खोकला,धाप लागणे,असे त्रास होत आहेत.धुळीमुळे पिकांच्या वाढीवर सुध्दा परिणाम होत आहे.तसेच कंत्राटदार यांनी सदर ठिकाणी दिवसातून दोन वेळेस पाणी टाकण्याची व्यवस्था करावी अशी मागणी वाहन चालक,व स्थानिक नागरिकांनी केली आहे