निंभोरा येथे ६ वर्षीय चिमुकली सह एक महिलेचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह !
निंभोरा (प्रतिनिधी)। येथील संशयित कोरोना तपासणी अहवाल निंभोरा सेंटरला सकाळी प्राप्त झालेले असून अहवालांमध्ये २ अहवाल कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे
आज निंभोरा सेंटर प्राप्त झालेल्या निंभोरा गावांतील कोरोना तपासणी अहवालात गावातील एक ६ वर्षीय चिमुकली व एक ३० वर्षीय महिला बाधित आढळून आले आहेत. गावांतील आजवर एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या ५४ झाली असून ग्रामीण भागातील कोरोनाचा प्रभाव कमी होत नसल्याचे दिसत असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांच्या कडुन दुजोरा मिळाला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.