निंभोऱ्यात संसर्ग कायम; आज आणखी २ अहवाल कोरोना बाधित !
निंभोरा (प्रतिनिधी)। येथील संशयित व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल निंभोरा सेंटरला आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये गावातील पुन्हा २ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे
आज आढळलेला बाधित रुग्णांमध्ये गावांतील २ पुरुष बाधित आढळून आले आहे, त्यात एक ३५ वर्षीय पुरुष व एक ६० वर्षीय असे दोन बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदरील रुग्ण शनी मंदिर एरिया भिलाड बुवा परिसर व एक त्रिमूर्ती चौक परिसरातील रहिवासी आहे. परिसरात चिंतेच्या वातावरणात भर पडली आहे संसर्ग कायम असल्याचे दिसून येत आहे, तर गावांतील बाधितांची संख्या ३७ झाली असून त्यात १४ उपचार घेत असून बाकी सर्व सुखरूप घरी परतले असून नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. सदरील वृत्तास वैद्यकीय अधिकारी डॉ.चंदन पाटील यांनी दुजोरा मिळाला आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाला लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणं, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.