निराधार व वृद्धापकाळात मिळणाऱ्या संजय गांधी,इंदिरा गांधी योजनेची समिती लवकर नेमावी – सावद्याचा नगरसेविका रंजना भारंबेची पालकमंत्र्यांकडे मागणी
सावदा ता.रावेर(प्रतिनिधी)। वृद्धापकाळात मिळणाऱ्या संजय गांधी व इंदीरा गांधी योजनेची समिती लवकरात लवकर नेमावी अश्या मागणीचे निवेदन सावद्याच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.रंजना भारंबे व जितेंद्र भारंबे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना दिले आहे.
संजय गांधी,इंदिरा गांधी वृद्धापकाळात तसेच विधवा, परीपक्व, दिव्यांग बांधवाना मिळणाऱ्या योजनेच्या लाभ मिळत होता परंतु सद्या स्थितीत संजय गांधी,इंदिरा गांधी वृद्धापकाळात योजनेची समिती गटीत न झाल्याने गेल्या १४ महिन्यापासून हजारो प्रकरणे रावेर तहसील कार्यालयात पडून आहे, यामुळे गरजू व निराधार जनतेला रावेर तहसील कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असून त्रास सहन करावा लागत आहे तरी सदरील समिती लवकरात लवकर नेमण्यात यावी व तोपर्यंत गेल्या काळातील जी प्रकरणे प्रलंबित आहेत त्यांना तहसीलदारांच्या अधिकारात तपासून गरजूंना लाभ देण्यात यावा असे मागणीचे निवेदन सावदा नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.रंजना भारंबे व जितेंद्र भारंबे यांनी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना दिले आहे