नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुका सचिव पदी रितेश भारंबे यांची निवड
भुसावळ । नॅशनल युथ कॉन्सिल ऑफ इंडियाच्या भुसावळ तालुका सचिव पदी रितेश संजय भारंबे यांची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील, जिल्हा अध्यक्ष प्रतीक्षा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा सचिव दिव्या पाटील यांच्या शिफाशीनुसार राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. दत्तचना मूर्ती रामू व महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. त्रेविनिकुमार कोरे यांच्या हस्ते देण्यात आले. या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. संपुर्ण देशासाठी राष्ट्रीय एकात्मतेसाठी काम करून राष्ट्रीय युवा परिषदेच्या वतीने सामाजिक , सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम राबविणार आहेत.