पंधरा हजारांची लाच घेताना पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात !
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे): गुन्ह्यात अटक करून तत्काळ जामीन मिळवण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात १५ हजारांची लाच स्वीकारताना अभोणा पोलिस ठाण्याचा हवालदार परशराम लक्ष्मण गांगोडे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरोधात आणि इतर संशयितांच्या विरोधात अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटक करून जामीन मिळण्यास मदत करण्याच्या मोबदल्यात हवालदर परशराम गांगोडे याने २० हजारांची लाच मागितली होती यानंतर तडजोडीअंती १५ हजारांची लाच देण्याचे ठरले व तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यासाठी सापळा लावला असता १५ हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ अटक केली असून अभोणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.