पत्रकारांचे कोरोना काळातील योगदान मोठे आहे– प्रांताधिकारी डाँ.अजित थोरबोले
सावदा प्रतिनिधी- रोज सकाळी वर्तमानपत्र वाचत असून आपल्या भागात काही घटना घडली आहे का याचा वृत्तांत घेत असतो बऱ्याच या घटना मला पत्रकार यांच्या माध्यमातून कळत असतात, समाजातील खरे प्रश्न पत्रकार मांडत असतात पत्रकार यांचे कोरोना काळातील योगदान मोठे आहे.
प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या हस्ते मंडे टू मंडे चे संपादक भानुदास भारंबे कोरोना योध्दा प्रशस्तीपत्र स्विकारताना.
आपण रावेर यावल तालुक्यात साडेपाच हजार सर्व क्षेत्रातील कोरणा युद्धाचा सत्कार केला आहे कोरोना काळात काम करत असताना मला रावेर यावल तालुक्यात माणसे चांगली मिळाली सावदा शहरातील पत्रकार यांनी नक्कीच उत्कृष्ट काम केले आहे व करीत आहे असे गौरवोद्गार फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी पत्रकारांचा कोरोणा योद्धा म्हणून सन्मान करतांना दि.२५ रोजी सावदा येथे विश्रामगृहावर सकाळी ११ वाजता काढले यावेळी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्ह्यात माझे कुटुंब माझी जबाबदारी हे अभियान चालू असून आशा वर्कर डॉक्टर तसेच आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या दारी तपासणीस आल्यास त्यांना विरोध न करता सहकार्य करा आपल्या कुटुंब प्रमुखाची जबाबदारी पार पाळा आपल्या कुटुंबाचे आरोग्य जपले पाहीजे असे आवाहनही या वेळेला थोरबोले यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष भानुदास भारंबे होते.
सावदा शहर पत्रकार संघटनेने ही केला प्रांताधिकारी यांचा सन्मान–
प्रांत अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले पत्रकारांचा सन्मान करण्यासाठी आले असता सावदा शहर पत्रकार संघटनेने देखील त्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला
या पत्रकारांचा झाला सत्कार–
भानुदास भारंबे श्याम पाटील सुरेश बेंडाळे, राजेंद्र भारंबे, रवींद्र हिवरकर, आत्माराम तायडे, कमलाकर पाटील ,पंकज पाटील, प्रवीण पाटील, जितेंद्र कुलकर्णी कैलास लवंगडे, राजेंद्र चौधरी, योगेश सैतवाल, संतोष नवले, शेख साजिद, रोशन वाघुलदे, राजेंद्र पाटील, राजेश पाटील,मिलिंद टोके, युसुब शहा
या छोटेखानी कार्यक्रमाचे प्रस्तावना प्रवीण पाटील यांनी मांडली सूत्रसंचालन आत्माराम तायडे यांनी केले व आभार पंकज पाटील यांनी मानले यावेळी मास्क सॅनिटायझर सामाजिक अंतर ठेवण्यात आले होते