पत्रकार हेच खरे समाजाचे रक्षक- समाजसेवक आबिद मलिक मेंबर सर
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
फैजपूर (प्रतिनिधी)। येथील एम.मुसा जनविकास सोसायटी व असंघटित गवंडी कामगार संघटनेच्या वतीने दिनांक १० -१-२१ रोजी आयोजित पत्रकार दिनानिमित्त फैजपूर शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. लेखणीची धार तसेच भारताचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांचा मानसन्मान कामगार संघटनेचे अध्यक्ष ठेकेदार शाकीर मलिक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मलिक आबिद सर मेंबर यांच्या हस्ते करण्यात आला.
पत्रकारांचे कार्य समाजाचेच नाही तर सर्व मानवजातीसाठी व देशासाठी उपयुक्त आहे. कोणतीही घटना असो आपल्या जीवाची पर्वा न करता समाजासमोर खरी व सत्य परिस्थितीचे वृत्तांकन समोर आणून देतो. पत्रकार हे खरे मानवतेचे रक्षक आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष मलिक आबिद सर मेंबर मार्गदर्शन करतांना सागितले. वार्ता फौंडेशनच्या अध्यक्षपदी प्रा. उमाकांत पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व पत्रकार व कामगारांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले. फैजपूर शहरातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. या यावेळी वासूदेव सरोदे, समीर तडवी, सलीम पिंजारी, मयूर मेढे, प्रा. उमाकांत पाटील, योगेश सोनवणे, प्रा. राजेंद्र तायडे, ललित फिरके सर, संजय सराफ, निलेश पाटील, जावेद काझी, शाकीर मलिक, कामगार उपाध्यक्ष इरफान शेख, सचिव शेख कबीर, करीम नथु तडवी, सद्दाम ईब्राहिम तडवी, खालीद आयुब शेख, सलीम ठेकेदार, सोहिल मलिक, इंजिनियर लुकमान भाई, सावदा येथील तय्यब मिस्त्री, वसीम, रफिक शेख, फैजपूर येथील सर्व पत्रकार उपस्थीत होते.