भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्यचाळीसगाव

परिस्थिती गंभीर आहे, रुग्णसेवा सुरु ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधी या नात्याने तुमच्या सोबत-आ.मंगेश चव्हाण

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

चाळीसगाव (शुभम देशमुख)। कोरोनाच्या पहिल्या लाटेत सरकारी व खाजगी कोविड सेंटर च्या माध्यमातून आपण चांगले काम केले त्यामुळे आपण चाळीसगाव तालुक्यात कोरोनावर नियंत्रण मिळवू शकलो मात्र दुसरी लाट अधिक तीव्र असून रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, परिस्थिती गंभीर आहे, सर्व यंत्रणा अडचणीत आहे मात्र अश्या परिस्थितीत रुग्णांना वैद्यकीय सेवेची गरज आहे त्यामुळे आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढत कोरोना विरोधातील लढा आपल्याला सुरु ठेवावा लागेल, लोकप्रतिनिधी या नात्याने मी तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन आमदार मंगेश चव्हाण यांनी दिले. अंत्योदय जनसेवा कार्यालयात चाळीसगाव शहरातील खाजगी कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा चालविणाऱ्या डॉक्टरांच्या बैठकीत ते बोलत होते.

शहरातील असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स, चाळीसगाव संचालित सरकारमान्य खासगी कोविड सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रेमडेसिवीर ( Injection Remdesivir ) ची अनुपलब्धता, मेडिकल ऑक्सीजनची कमतरता या अडचणींमुळे अत्यवस्थ रुग्णांवर उपचार करणे जिकिरीचे झाले असून रुग्णांच्या जीवितासही  धोका उत्पन्न होत आहे, त्यामुळे  रुग्ण, रुग्णांचे नातेवाईक व समाजात उद्रेक झाल्यास  जबाबदार कोण ? वरील समस्यांचे निराकरण करावे अन्यथा खासगी कोविड सेंटर बंद करणे हाच पर्याय राहील असा इशारा चाळीसगाव तालुक्यातील खाजगी कोविड सेंटर चालकांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला होता. आमदार मंगेश चव्हाण यांनी सदर निवेदनाची तात्काळ दखल घेत सर्व खाजगी कोविड सेंटरच्या डॉक्टरांची बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, तहसिलदार अमोल मोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार करंबळेकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम, पंचायत समिती गटनेते संजय भास्करराव पाटील यांच्यासह डॉ अनिकेत पवार, डॉ कुणाल तलरेजा, डॉ मंगेश वाडेकर, डॉ विनय पाटील, डॉ शैलेंद्र महाले, डॉ रणजीत राजपूत, डॉ संदीप देशमुख, डॉ देवेंद्र पाटील, डॉ नितीन पवानी, डॉ तुषार राठोड, डॉ.अनुराधा खैरनार आदी उपस्थित होते.

यावेळी झालेल्या चर्चेत खाजगी कोविड सेंटर डॉक्टरांनी सांगितले की, ड्रग इन्स्पेक्टर कडून रेमडेसिवीर होणारा पुरवठा अत्यंत कमी प्रमाणात आहे. हॉस्पिटल ला दररोज ४० इंजेक्शन ची गरज असतांना, २-३ दिवसाआड फक्त ३ ते ४ इंजेक्शन उपलब्ध होत आहेत. तसेच चाळीसगाव शहरातील कोव्हीड सेंटरला दररोज अंदाजे ४०० जंबो सिलेंडरची आवश्यकता असतांना, फक्त ४० ते ५० सिलेंडर उपलब्ध होत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव शहरातील ऑक्सिजन पुरवठादार पलक गॅस व गौरी गॅस यांच्या मालकांना बोलावून घेत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी सदर ऑक्सिजन पुरवठादार यांनी सांगितले आम्ही जळगाव व औरंगाबाद येथून ऑक्सिजन सिलेंडर मागवतो मात्र  ३५० चे सिलेंडर ५०० ते ६०० ला मिळत असल्याने अडचणी येत असल्याचे सांगितले. त्यावर आमदार चव्हाण यांनी सांगितले की, लवकरच जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन ऑक्सिजन दर निश्चित करण्याची विनंती करणार असल्याचे आश्वासन दिले.कोविड रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक असणारा प्लाझ्मा उपलब्ध करून देण्यासाठी ज्यांना कोव्हीड होऊन ६ आठवडे ते ६ महिने झाले आहेत त्यांनी प्लाझ्मा दान करावेत यासाठी अभियान राबविण्याच्या सूचना देखील आमदार चव्हाण यांनी शासकीय वैद्यकीय अधिकारी यांना केल्या.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!