पाच हजारांची लाच घेतांना हवालदार एसीबीच्या जाळ्यात
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
नाशिक (निशाद साळवे) :- मालेगाव येथील एक पोलीस हवालदारला पाच हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की मालेगाव शहरातील आयशा नगर पोलिस ठाण्यात असलेले हवालदार श्रावण किसन माळी यांनी या पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी आरोपीच्या भावाकडे केली होती. यामुळें आरोपीच्या भावाने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली असता सापडा लावण्यात आला त्यानुसार ही लाच घेताना दुपारच्या वेळेस आयेशा नगर पोलीस स्टेशन समोरील रोडवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळा मध्ये हवालदार श्रावण किसन माळी यास रंगेहाथ पकडले असून अटक करण्यात आली आहे.