भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

ताज्या बातम्यायावल

पाणी मुबलक उपलब्ध असताना वीज पुरवठा अभावी चार दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा, यावलकरांच्या संतप्त प्रतिक्रिया.

यावल(प्रतिनिधी)। हतनुर धरण पाटाच्या माध्यमातून यावल नगरपरिषदेच्या साठवण तलावात मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध आहे. परंतु यावलकरांना 4 दिवसाआड अशुद्ध पाणीपुरवठा होत असल्याने संपूर्ण यावलकरांमध्ये नगरपरिषद प्रशासनाबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत असल्या तरी यावल शहरात व साठवण तलावाच्या ठिकाणी आणि फिल्टर हाऊस परिसरात दररोज अनियमित वीजपुरवठा होत असल्याने 4 दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याची माहिती यावल नगरपरिषद पाणी पुरवठा विभाग प्रमुख रमाकांत मोरे यांनी दिली.

यावल शहराची लोकसंख्या 39 हजार आहे. पाणीपुरवठा होण्यासाठी यावल नगरपरिषदेने यावल शेती शिवारातून गेलेल्या हतनूर धरणाच्या पाटाजवळ साठवण तलाव बांधकाम केले आहे पाटातून मुबलक पाणी मिळत असते, साठवण तलावातून फिल्टर हाऊस मध्ये पाणी आणले जाते फिल्टर हाऊस मधून साने गुरुजी विद्यालया जवळील 22 लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत तसेच सातोद रोडवरील नवीन प्रशासकीय इमारतीच्या पाठीमागील दोन ते अडीच लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीत पाणी आणले जाऊन त्यातील पाणी संपूर्ण यावल शहरात ठिकठिकाणी पाईप लाईनवर व्हाल बसवून पाणी पुरवठा करण्यात येत असतो ही पाणीपुरवठा प्रक्रिया साठवण तलावावर 2 , फिल्टर हाऊस वर 2 , आणि व्हालमन 2 , असे एकूण फक्त 6 कर्मचाऱ्यांन मार्फत आणि काही ठेकेदारी, रोजंदारी करणाऱ्या मजुरांमार्फत पार पाडली जात आहे.
विकसित भागात पाणीपुरवठा होण्यासाठी विरारनगर परिसरात 10 लाख लिटर क्षमतेची नवीन पाण्याची टाकी माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांनी सतत पाठपुरावा करून बांधकाम करून घेतले आहे टाकीवरून विकसित भागात पाणीपुरवठा करण्यासाठी लवकरच संपूर्ण विकसित भागात नवीन पाईप लाईन टाकली जाणार आहे याबाबत पाईपलाईनचे संपूर्ण साहित्य उपलब्ध झाल्याचे सुद्धा समजले.

यावल नगरपरिषद हद्दीतील विकसित भाग वगळता यावल नगरपरिषदेच्या कार्यकाळात आजी-माजी काही अध्यक्ष आणि आजी माजी काही न.पा. सदस्यांनी आपल्या पदाचा, सत्तेचा आणि राजकीय, सामाजिक प्रभावाचा आपल्या वार्डात, वाड्यातील नागरिकांच्या व वैयक्तिक सोयीनुसार वापर करून पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजन शून्य पाईपलाईनचे जाळे ठिक- ठिकाणी निर्माण केले आहे त्यामुळे अनेक भागात पाणीपुरवठा कमी दाबाने कमी प्रमाणात तर काही भागात जास्त दाबाने मुबलक प्रमाणात होत आहे. पाणी पुरवठ्याची दरडोई आकडेवारी लक्षात घेता 75 ते 90 लिटर पाणी वाटपाचे शासकीय निकष आहेत परंतु आज रोजी प्रत्यक्षात यावल नगरपालिकेच्या नियोजना अभावी दरडोई 800 ते 900 लिटर एवढा मोठा वाजवीपेक्षा जास्त पाणी पुरवठा यावल शहराला केला जात आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!