भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

जळगावराजकीय

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचं सट्टा चालवणाऱ्यांशी कनेक्शन? माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा गंभीर आरोप

जळगाव, मंडे टू मंडे न्युज :  वाळू माफियांच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. तसेच जिल्ह्यात सट्टा ही सुरू आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वाळू माफिायंच्या भ्रष्टाचारात प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील सहभागी आहेत. पालकमंत्र्यांची वाहने दररोज धरणगाव तालुक्यात वाळू वाहण्यासाठी फिरत आहेत. गुलाबराव पाटील यांचा सट्टा चालवणाऱ्यांना आशीर्वाद आहे, असा गंभीर आरोप गुलाबराव देवकर यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

मीडियाशी संवाद साधताना गुलाबराव देवकर यांनी हा गंभीर आरोप केला आहे. या जिल्ह्यात वाळू माफियांच्या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. या भ्रष्टाचारात प्रशासकीय यंत्रणा आणि पालकमंत्रीही सामील आहेत. पालकमंत्र्यांची वाहने रोज रेती वाहण्यासाठी धरणगाव तालुक्यात फिरत आहेत. पालकमंत्रीच जर रेती वाहतूक करणार असेल आणि सट्टा चालवणाऱ्यांना त्यांचा आशीर्वाद असेल, बोगस रेशन विक्रेत्यांना त्यांचा आशीर्वाद असेल, दारू विक्रेत्यांना त्यांचा आशीर्वाद असेल तर जनतेने न्याय कुणाकडे मागायचा?, असा सवाल गुलाबराव देवकर यांनी केला आहे.

धरणगाव शहरात पाळधी गावात टपऱ्या टपऱ्यावर दारू विकली जाते. सट्टा लावला जातो. हे पालकमंत्री काय करत आहेत? या जिल्ह्यातील, धरणगाव तालुक्याची अक्षरश: दैना सुरू आहे. युवकाचे जीवन उद्ध्वस्त करण्याचं काम पालकमंत्री करत आहेत. त्यामुळे आम्ही प्रशासनाला जाब विचार आहोत. तुम्ही काय धोरण आखणार आहात? काय निर्णय घेणार आहात? बेरोजगारी वाढत आहे. शासन काही करत नाही. तरुण आत्महत्या करत आहेत. त्यावर सरकार काय उपाय करणार आहे? हा सुद्धा आमचा सवाल आहे, असं गुलाबराव देवकर म्हणाले.

पुढे ते असेही म्हणाले की, जे रक्षक असायला हवेत. तेच भक्षक झाले आहेत. त्यांच्याच माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली जात आहे. अवैध रेती वाहतुकीमुळे अपघात होत आहे. आमदार लता सोनावणे यांच्या वाहनाला अपघात झाला. तो रेतीचा ट्रक होता. आव्हाने गावात १५ दिवसांपूर्वी अपघात झाला होता. एका रिक्षाला वाळूच्या ट्रकने धडक दिली होती. रोज अपघात होत आहेत. पण प्रशासन काहीच करत नाही, त्याकडेही आम्ही प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत, असं देवकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!