क्राईमताज्या बातम्याराष्ट्रीय

पोलिस हत्याकांडातील आरोपी कुख्यात गुंड विकास दुबेचे एन्काऊंटर !

कुख्यात गुंड विकास दुबे कानपूर पोलिसांकडून एन्काऊंटरमध्ये ठार झाल्याची ताजी माहिती समोर येत आहे. काल विकास दुबेला अटक करण्यात आली होती. आज सकाळी उत्तर प्रदेशची स्पेशल फोर्स टीम त्यांना मध्य प्रदेशच्या उजैवमधून कानपूर येथे आणत असताना गाडीचा अपघात झाला. या दरम्यान, विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलीस आणि दुबेमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी त्याला गोळ्या घातल्या. त्यात तो मारला गेल्याची माहिती सांगितली जात आहे.

कुख्यात गुंड विकास दुबे याला काल कानपूर पोलिसांनी अटक केली होती. आज पहाटे त्याला मध्य प्रदेशमधील उजैन येथून कानपूर आणले जात होते. यावेळी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सची विकास दुबेला आणत होती. दरम्यान, भौती गावात पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. गाडी पलटली. या प्रसंगाचा फायदा घेत विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याने पोलिसांचीच बंदूक हिसकावून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. पोलिसांनीही त्याला थांबवण्यासाठी गोळीबार सुरू केला. त्याला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. मात्र तो गोळ्या झाडत राहिला. या चकमकीत पोलिसांकडून विकास दुबे मारला गेला. विकास दुबेच्या छातीवर गोळ्या लागल्या. तर पोलिसांचेही दोन जवान जखमी झाले आहेत. गंभीर अवस्थेत कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!