पोलीस अधीक्षकांची “अवैध धंदे बंद” ची घोषणा हवेतच विरली… फैजपूर मध्ये ” मटकाकिंग” चे जाळे भक्कम, अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ की प्रेमपूर्ण अर्थकारण ?
सावदा (प्रतिनिधी)। जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा पदभार घेतला त्या वेळी त्यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे पूर्णपणे बंद करू, त्यांचेवर कारवाई करू, असे पत्रकार परिषदेत आश्वासन दिले होते. परंतु एकंदरीत पाहता अशी कुठलीही परिस्थिती दिसून येत नाही, फैजपूर शहरात अव्याहत पणे, खुलेआम, अवैध धंदे सुरूच आहेत, फैजपूर शहरात ” मटकाकींग “चे जाळे इतके भक्कम झाले आहे की, अगदी फेविकाल का जोड.
या खुलेआम सुरू असलेल्या अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ असल्याने तर पोलीस पाठीशी घालत नाही ना ..?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे ,फैजपूर पोलिसस्टेशन अंतर्गत फैजपूर शहरातील सट्टा -मटका चे ” केंद्रबिंदू “असलेले महत्वाचे ठिकाण सुभाष चौकातील पोलीस चौकी पासून अगदी हाकेच्या अंतरावरच आहे, फैजपूर शहरात खुलेआम पणे अवैध धंद्याचा बोलबाला असताना या कडे जाणूज -बुजून दुर्लक्ष केले जाते, यावर पोलीस प्रशासन कुठलीही कारवाई करीत नाही, उलट त्यांची पाठराखण करण्याचे काम पोलीस प्रशासन करीत असल्याचे परिसरात बोलले जाते, जिल्हा पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याची घोषणा केली होती त्या प्रमाणे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असतील तर फैजपूर शहरा मध्ये अवैध धंदे कसे सुरू आहेत, जर एस पी साहेबांचे आदेश मानले जात नसतील तर सामान्य जनतेचे काय ? असा प्रश्न जनतेत उपस्थित केला जात आहे, पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंडे यांनी पदभार स्वीकारल्याच्या आधीपासूनच फैजपूर मधील सट्टा मटक्या सारखे अवैध धंदे कुठलाही खंड न पडता बिनधास्त पणे सुरू असल्याचे दिसत असल्याने एस पी साहेबाच्या आदेशाचा कुठलाही परिणाम दिसून येत नसल्याने आच्चर्य व्यक्त केले जात आहे, कोरोनाच्या लाकडाऊन मुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले, रोजगार गेल्याने अनेक लोक बेरोजगार झाले, यामूळे आर्थिक मांदीचा मोठा फटका बसल्याचे आर्थिक तज्ञ सांगत असले तरी सट्टा -मटका धंद्यावर मात्र कुठलाही परिणाम दिसून आलेला नाही, उलट हा धंदा मोठ्या तेजीत आलेला आहे, दररोज लाखो रुपयांची या धंद्याद्वारे उलाढाल होत असल्याने यातून लाखों रुपयाची कमाई केली जात असून, ‘अर्थपूर्ण प्रेमाचे’ सम्बधातून हे अवैध धंदे सुरू असल्याचे खुलेआम पणे बोलले जाते, कारण लागेबांधे असल्याशिवाय हे धंदे चालणं शक्यच नाही, संबंधितांवर कारवाई करून सट्टा -मटका बंद करण्याची मागणी केली जात असून, पोलीस अधीक्षकांनी दिलेले आश्वासन पाळले जाईल काय ? पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे साहेब कारवाई कधी, केव्हा करतात या कडे संपूर्ण फैजपूर वासीयांचे लक्ष लागून आहे. ( भाग – २ )