प्रहारचे गोमुञ फवारणी सेवाकार्य 6 दिवसापासुन सुरुच !
मलकापूर (प्रतिनिधी)। कोरोनाने आज सर्वत्र थैमान घातले असून मलकापूर तालुक्यात तर कोरोना संसर्गित रूग्ण अधिक प्रमाणात आढळून आले आहे. तेव्हा शासन- प्रशासनाच्या उपाययोजनां बरोबर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शहरात करण्यात येणारा गो मुत्र फवारणीचा उपक्रम स्तुत्य असून ‘गो मुत्रा’ मुळे मलकापूर तालुक्यातून कोरोना ‘गो’ होण्यास निश्चितच फायदा होईल गेल्या 6 दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी कोरोनावर उपाययोजना म्हणून शहरातील विविध प्रभागामध्ये गो मुत्र फवारणीचा उपक्रम राबवित आहेत.
आज जुना गाव,मंगेलगेट,गाडेगाव मोहल्ला,दुर्गानगर,काळीपुरा,नसवाला चोक,लखानी चौक गोमुत्र फवारणी करण्यात आली गोमुञ फवारणीच्या उपक्रमाचे समाजसेवक चंद्रकांतजी वर्मा,यश संचेती यांनी कौतुक करुन प्रहारच्या कार्यांला शुभेच्छा दिल्या यावेळी प्रहार जनशक्ती पक्ष उपजिल्हा प्रमुख अजय टप, प्रहारचे शहर प्रमुख शालीकराम पाटील, तालुका प्रमुख अजित फुंदे,युवा तालुका प्रमुख अमोल बावस्कार, तालुका उपप्रमुख बळीराम बावस्कर,समाजसेवक चंद्रकांतजी वर्मा,शिवाजी भगत,शितलताई जांगडे,संजय इंगळे,यश संचेती,न्युज रिपोटर अनिल गोठी आदी उपस्थित होते.