भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

प्रा.आ.केंद्र हिंगोणा ता यावल येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान अंतर्गत सर्वेक्षण मोहिमेला सुरुवात….

यावल (सुरेश पाटील)। नुकतेच मा. मुख्यमंत्री श्री उध्दवजी ठाकरे साहेबांच्या संकल्पनेतुन माझे कुटंब माझी जबाबदारी या मोहिमेस सबंध महाराष्ट्रात सुरुवात करण्यात आली आहे.आज यावल तालुक्यातील प्रा.आ.केंद्र हिंगोणा अंतर्गत न्हावी गांवात जि.प.सदस्य तथा गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे,पं.स. सदस्य सरफराज तडवी, ग्रा.पं.सदस्य मिलिंद महाजन, वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर,यांच्या प्रमुख उपस्थितित मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.

मोहिमेच्या सरुवातीस जि.प.सदस्य प्रभाकर सोणवने व वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर यांनी न्हावी गांवातील ग्राम पंचायत कार्यालयात सिस्टर,ब्लॉक फेसिलेटर,आशा वर्कर्स यांची मिटिंग घेऊन सदरील मोहिमेची माहिती देत कोरोना नियंत्रण करण्याकरीता योग्य त्या उपायोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले.
त्यानंतर न्हावी गांवातील घरोघरी जाऊन सिस्टर्स व आशावर्कर च्या माध्यमातुन सर्वेक्षणास सुरुवात करण्यात आली.यात कुटुंब,परिवार, गाव, शहर आणि राष्ट्रहितार्थ फेस मास्कचा वापर करणे, शारीरिक डिस्टन्स/अंतराचे पालन करणे,वारंवार हात धुणे, कमीत कमी प्रवास करणे या बाबत प्रत्येक कुटुंबातील सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.अभिषेक ठाकुर हे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा साथरोग अधिकारी यांच्यासोबत जिल्ह्याच्या वॉररुम च्या कामकाजात सक्रीय सहभाग घेऊन , जि.परिषदच्या बाह्य रुग्ण विभागाचे कामकाज सांभाळत हिंगोणा-फैजपुर येथे अहोरात्र देत असलेल्या रुग्णसेवेचा गौरव करत,आज तागायत त्यांनी हजारो रुग्णांचे स्वैब घेऊन त्यांना दिलेले जिवदान हे प्रशंसनीय आहे अशा शब्दांमध्ये जि.प.सदस्य प्रभाकर अप्पा नारायण सोनवनणे यांनी त्यांचा गौरव केला. तसेच लोकप्रतिनीधींनी त्यांना साथ द्यावी असे आवाहन केले यावेळी त्यांच्यासमवेत पं.स.सदस्य तसेच जि.प.सदस्य सोनवणे, सरफराज तडवी, ग्रा.पं.सदस्य मिलिंद महाजन,वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिषेक ठाकुर, आरोग्य सेवक विलास महाजन,आ.सेविका के.टी.पाटील,कैलास कोळी, ब्लॉक फेसिलेटर,आशा वर्कर्स व गांवातील प्रतिष्ठीत नागरीक उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!