भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

प्रेम संबंधाच्या वादातून तरुणीने जाळले तरुणाचे घर

मंडे टू मंडे वृत्तसंकलन।

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील चुंचाळे या गावी प्रेम संबंधातील वादावरून एका तरूणाचे घर जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली असून यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, शरद अशोक पाटील ( रा. रामेश्‍वर कॉलनी, जळगाव) हा चुंचाळे येथील आपल्या मूळ घरी विवाहासाठी आला होता. शरदचे गावातीलच मूळ रहिवासी व सध्या रत्नागिरी येथे पोलीस दलात कार्यरत असणार्‍या तरूणीशी प्रेमसंबंध होते. रविवारी त्यांच्या कुटुंबात विवाह समारंभ सुरू असतांना संबंधीत तरूणी ही तिच्या कुटुंबियांसह मंडपात वाद घालण्यासाठी आली. त्यांनी शरदला मारहाण करून त्याच्या घराला आग लावली.या बाबत शरद पाटील याच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसार संबंधीत तरूणीसह फिरोज जुम्मा तडवी, अफरोज जुम्मा तडवी, मुमताज जुम्मा तडवी, संजू तडवी व अन्य अशा एकूण सात जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!