फैजपुर मध्ये एक तर हिंगोण्यात दोन रुग्णांना कोरोनाची बाधा !
फैजपुर (प्रतिनिधी)। यावल तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून काल बुधवारी रात्री उशिरा आलेल्या अहवाला नुसार फैजपूर येथे पुन्हा १ व हिंगोणा येथे २ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सविस्तर माहिती अशी, आलेल्या बाधित अहवालमध्ये फैजपुर येथील एक ५८ वर्षीय रुग्ण स्वामी समर्थ केंद्र परिसरातील असून बाहेरगावचे रहिवासी आहेत. तर हिंगोणा येथे बाधित आढळलेल्या २ रुग्ण यामध्ये एक महिला ७२ वर्ष व एक पुरुष ५३ वर्ष बाधित आढळून आले आहेत. हिंगोणा येथील हे दोघे रुग्ण एकाच परिवारातील असून मस्जिद जवळील रहिवासी आहेत. सदरील घटनेने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
मंडे टू मंडे तर्फे आवाहन –
कोरोनाचा लढा देण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या, परिवाराच्या व परिसराच्या सुरक्षेसाठी आपल्याला जगुन कोरोना विरोधात लढा द्यायचा आहे म्हणुन घाबरून न जाता सर्व नागरिकांनी शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनाचे पालन करावे ही आता स्वतः ची जबाबदारी आहे तसेच फिजिकल डिस्टन्स चे पालन, मास्क वापरणे, सॅनिटाझरचा वापर करणे व अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर निघु नये अशा शासनाने दिलेल्या सर्व आदेशांचे पालन करावे.