भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

आरोग्ययावल

फैजपुर येथील तपासणी शिबिरात ८ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह !

फैजपूर (प्रतिनिधी) । शहरात न्हावी येथील ग्रामीण रुग्णालय व फैजपूर नगरपालिका यांच्या सहकार्याने तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत सर्व व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी म्युनिसिपल हायस्कुल येथे आज घेण्यात आली. यामध्ये एकूण १७५ जणांची तपासणी करण्यात आली असून ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहेत.

शहरातील आज झालेल्या कोरोना तपासणी शिबिरात एकूण १७५ जणांची तपासणी करण्यात आली त्यात ८ जण कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे निष्पन्न झाले असून बाकी १६७ अहवाल निगेटिव्ह आले आहे. सदरील कोरोना तपासणी जे व्यापारी व्यावसायिक स्वतःहून करून घेणार नाहीत अशा व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून त्यांची दुकाने सील करण्यात येतील असे मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी सांगितले असून शिबिरास प्रांतधिकारी डॉ. अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, डॉ. अभिजीत सरोदे ,पी. एम. पाटील, मनोज चव्हाण, महसूल विभागाचे सर्कल बी. जे. बंगाळे, तलाठी प्रशांत जावळे, नगरपालिकेचे कर्मचारी अश्विनी खैरनार, सुधीर चौधरी, बाजीराव नवले, संतोष वाणी, दिलीप वाघमारे, दिनेश तेजकर, निलेश दराडे, व्ही. एस. जवडे, आरती पाटील व अलका वैद्यकर यांची उपस्थिती होती.

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!