भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमयावल

फैजपूर मध्ये आठ लाखाचा गुटका जप्त, या सह सट्टा मटक्यावर सुद्धा कारवाई होईल काय…. ?

फैजपूर (प्रतिनिधी)। अवैध गुटखा विक्री व वाहतुकीविरुध्द अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक मोहीम सुरू केली असून एका धडक मोहिमेंतर्गत बुधवार ९ डिसेंबर रोजी फैजपूर, ता. यावल, जि. जळगाव येथे अन्न व औषध प्रशासन व फैजपूर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात सुमारे ७ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखु या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा जप्त केला.

फैजपूर शहरातील मिल्लत नगर भागात प्रतिबंधित अन्न पदार्थ साठवलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव व फैजपूर पोलीसांनी संयुक्तपणे मिल्लत नगर भागातील बहिणाबाई मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या शेख मोहसीन शेख युनुस उर्फ कल्लू यांच्या राहत्या घराच्या मागील बाजूस असलेल्या हिरव्या नेटच्या सहाय्याने बनविलेल्या आडोशाच्या शेडमध्ये छापा टाकला असता प्रतिबंधित अन्न पदार्थ साठविलेला आढळून आला. याप्रकरणी फैजपूर पोलिस स्टेशन येथे संबंधित व्यक्तीविरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

संबंधित बातम्या- पोलीस अधीक्षकांची “अवैध धंदे बंद” ची घोषणा हवेतच विरली… फैजपूर मध्ये ” मटकाकिंग” चे जाळे भक्कम, अवैध धंद्यांना राजकीय पाठबळ की प्रेमपूर्ण अर्थकारण ?

संबंधित बातम्या- फैजपुरात मटका (सट्टा) व्यवसाय जोमात; पोलिसांच्या भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह…..!

सदर कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी अरविंद कांडेलकर, किशोर साळुंके यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वानखेडे व पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पोलीस कर्मचारी यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सदर कारवाई ही अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त यो. को. बेडकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामधील मुख्य सुत्राधाराचा शोध घेतला जात असून जळगाव जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने गुटख्याविरुध्द तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती सहाय्य आयुक्त, अन्न व औषध प्रशासन विभाग, जळगाव श्री. यो.को.बेंडकुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.
त्याच प्रमाणे फैजपूर शहरात सट्टा -मटक्याने जोर धरला असून उघळ पणे सुरू असलेल्या मटक्यावर कारवाई का केली जात नाही ? गुटक्याचा परवानगी नाही ,मग सट्याला परवानगी आहे काय ? असा सवाल जनते कडून विचारला जात आहे,

बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!