बलवाडी-खिर्डी रस्त्याचे काम संथगतीने – संबंधितांचे दुर्लक्ष…
मंडे टू मंडे वृत्तसंकलन।
खिर्डी ता.रावेर (विशेष प्रतिनिधी):- गेल्या ५ते६महिन्यांपासून खिर्डी ते बलवाडी रस्त्याचे कडेला खोदलेल्या साईड पट्टया बुजविण्याचे काम दि.२१ ऑक्टो.रोजी सुरू झाले असता मध्येच काही कारणास्तव काम अपूर्ण अवस्थेत होते तसेच काही दिवसांनी संबधित ठेकेदाराने रस्त्याची एक साईड जेसीबी च्या साह्याने खोदून ठेवलेली असून त्या ठिकाणी खडीचे ढीग टाकल्याने ३किमी.चे अंतर पर्यंत एक साईड ने वाहतूक सुरू असल्याने समोरून वाहन आल्यास एकमेकांना साईड देताना खूप अडचण निर्माण होत असून तारे वरची कसरत करावी लागते.
महिना भरा पासून सदरील कामाची चाल ढकल मुळे काम संथ गतीने सुरू आहे या बाबत संबधित ठेकेदाराला जाब विचारला असता निधी अभावी काम बंद आहे अश्या प्रकारची उत्तर देतात.नेमके पाणी कुठे मुरतेय असा संतप्त सवाल सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. तसेच निंभोरा येथे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरू असल्याने पर्यायी रस्ता पूर्ण बंद होण्याच्या मार्गावर असून केव्हा बंद होईल याची शास्वती नाही. या मार्गावरील अवजड वाहनांची वाहतूक बलवाडी मार्गे वळविण्यात आल्यास वाहनांची वर्दळ वाढली असता अपघात घडण्याची दाट शक्यता नाकारता येत नसल्याने खिर्डी-बालवाडी रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी वाहन धारकांनी केली आहे.