बहीण-भावाचे भाऊबीजेच्या दिवशीं विष प्राशन; बहिणीचा मृत्यू
जळगाव (प्रतिनिधी) येथील तालुक्यातील भोलाणे गावांतील सोमवारी सायंकाळी बहिण-भावाने भाऊबिजेच्या दिवशी विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली असून यात बहिणीचा मृत्यू झाला तर, भावावर उपचार सुरु आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, विश्वजित विजय सपकाळे (वय-२१) आणि अश्विता विजय सपकाळे (वय-१८) राहणार भोलाणे हे दोन्ही भाऊबहिण मुंबई येथे उच्चशिक्षण व नोकरी करत होते. परंतू लॉकडाऊनमुळे दोघे बहिणभाऊ भोलाणे येथे परत आले होते व घरीच बसून काम व अभ्यास करत होते. परंतू सोमवारी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दोघांनी एकामागून एक विषारी औषध प्राशन केले. दोघांनी नेमकं विषारी औषध प्राशन का केले?, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. दोघांना अत्यवस्थ पाहून नातेवाईकांना तातडीने जळगाव शहरातील खासगी रूग्णालयात हलविले. परंतू अश्विताचा रात्री ८.३० वाजेच्या सुमारास रस्त्याच मृत्यू झाला. दुसरीकडे विश्वजित याला अत्यवस्थ अवस्थेत खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.