भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचाराचा, कर्दनकाळ ठरणारे परखड, निर्भिड न्युज नेटवर्क

क्राईमताज्या बातम्याराष्ट्रीय

बाईक चालविणाऱ्यांसाठी रस्ते वाहतून मंत्रालया कडुन नवे नियम !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): केंद्र सरकारकडुन भारतातलं अपघाताचं प्रमाण कमी करण्यासाठी बाईक चालविणाऱ्यांसाठी आणि मागे बसणाऱ्यांसाठी नवे नियम व काही नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत असणार आहेत. तसेच रस्ता सुरक्षेसाठी या गोष्टींचं पालन सगळ्यांनी करावं असं आवाहनही करण्यात आलं आहे.

रस्ते वाहतून मंत्रालयाने केलेल्या नव्या नियमानुसार

  • बाईकवर मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूला हँड होल्डर असणे गरजेचं आहे. सध्या बहुतेक गाड्यांना अशी सुविधा नसते. त्याच बरोबर दोन्ही बाजून फुटरेस्ट असणेही सक्तीचं करण्यात आलं आहे.
  • बाईकवर आता मागे कंटेनरही लावता येणार आहे. त्याची लांबी 550 MM तर रुंदी 510 MM आणि उंची 500 MM पेक्षा  जास्त नसावी. अशा प्रकारचं कंटेनर असेल तर मागे बसण्याला परवानगी नाही.
  • बाईकच्या मागच्या चाकाचा अर्धा भाग हा कव्हर केलेला असावा. त्यामुळे मागे बसणाऱ्याचे कपडे त्यात जाणार नाहीत. अनेक अपघात याच गोष्टींमुळे होतात.
  • दरम्यान,  इलेक्ट्रिक कार (Electric Car) ची विक्री आणि उत्पादन आणखी वाढावे, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. त्यामुळेच इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिक वाहनांना आता एक वेगळी ओळख मिळणार आहे. त्याच बरोबर बीएस-6 वाहनांसाठी नंबर प्लेटवर नवीन रंग आणि स्टिकर असणार आहे.
  • त्याचबरोबर 3.5 टन वजनाच्या वाहनांसाठी टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम बसविण्याची सूचनाही सरकारने दिली आहे. ही सिस्टिम लावली तर ड्रायव्हरला गाडीच्या हवेची स्थिती योग्य आहे की नाही याची माहिती मिळणार आहे.
  • आता यापुढे इलेक्ट्रिक गाड्यांची नंबर प्लेटही वेगळ्या रंगाची असणार आहे. या गाड्यांची नंबर प्लेट (Car Number Green Plate ) हिरव्या रंगात असणार आहे. याबद्दल केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, ‘ज्या गाड्या या बॅटरीवर चालणाऱ्या आहे. त्या गाड्यांची वेगळी ओळख असावी यासाठी त्यांच्या नंबर प्लेट या हिरव्या रंगात असणार आहे आणि त्यावर पिवळ्या रंगाची अक्षर असावी.’
  • सर्व बाईक निर्मात्या कंपन्यांना या नियमांचं पालन नव्या गाड्या तयार करतांना करावं  लागणार आहे.
बातम्यांच्या अपडेट मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
शेअर करा...
error: आम्हाला Copy करण्यापेक्षा शेअर करा !!